१. गंभीर विचार (Critical Thinking)आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये


 1.गंभीर विचार  (Critical Thinking).


नमस्कार 🙏

 आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखादा अचूक निर्णय घेताना हे करू की नको?, कसं करू?, मला जमेल का?, आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते कळत  नाही ? गंभीर विचार (Critical Thinking) कसा करावा .?ते काय आहेत ?ते कुठे वापरायचे? कसे वापरायचे ?

जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. 

नमस्कार ,मी नेहल शिंदे.
Certified Career Analyst 
Founder of Nesa Learning Solution LLP.
With 20  years experience in educational field. 
 
 मला ,येत्या 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे.
जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही  कौशल्य हे जीवनकौशल्य (Life Skills )समजले जाऊ शकते.

शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहेच  पण कौशल्य ही सर्वात महत्त्वाची असतात. 

तर चला जाणून घेऊयात आयुष्य बदलणारी  कौशल्ये त्यातील पहिले 
कौशल्य

    १ .गंभीर विचार  (Critical Thinking).


 गंभीर विचार (Critical Thinking)काय आहे?

टीका  किंवा तथ्यांमधील कनेक्शन समजून घेण्यासाठी  तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची क्षमता.

क्रिटिकल थिंकिंग म्हणजे सुयोग्य नेमके निर्णय घेणं! 

आपण कशावर विश्वास ठेवावा हे ठरविण्यात मदत करते.  हे “विचार करण्याबद्दल विचार करणे” आहे - ओळखणे, विश्लेषण करणे आणि नंतर विचार करण्याच्या मार्गातील त्रुटी दूर करून,‘आउट ऑफ द बॉक्स’ प्रकारचा हयात विचार करावा लागतो.

 बुद्धिमत्तेच्या म्हणजेच ‘इंटेलिजंट कोशंट (IQ)’च्या जोडीला भावनिक कौशल्यंही ,इमोशनल कोशंट (EQ)’सुद्धा चांगला असावा लागतात . 

 




गंभीर विचारांची कौशल्ये: उदाहरणे.

 विश्लेषण:-(Analysis) 
माहिती आणि ज्ञान एकत्रितपणे प्रक्रिया करण्याची क्षमता.

 व्याख्या:-(Interpretation)
प्रक्रिया केलेल्या माहितीचा अर्थ काय आहे यावर निष्कर्ष काढणे.
 
अनुमान :-(Inference:)
आपल्याकडे असलेले ज्ञान पुरेसे आणि विश्वसनीय आहे की नाही याचे मूल्यांकन करणे.

मूल्यांकन (Evaluation):-
 उपलब्ध माहितीच्या आधारे निर्णय घेण्याची क्षमता.
 
स्पष्टीकरण (Explanation):-
आपल्या निष्कर्षांवर संप्रेषण आणि तर्क स्पष्टपणे सांगणे.

 स्वयं-नियमन(Self-Regulation):-
आपल्या विचार करण्याच्या पद्धतींचे निरंतर परीक्षण आणि दुरुस्त करण्यासाठी 
 
खुलेपणा(Open-Mindedness)
 इतर शक्यता आणि दृष्टिकोन विचारात घेणे.
 
समस्या सोडवणे (Problem-Solving):-
 अनपेक्षित समस्या व संघर्ष सोडविण्याची क्षमता.



आता एक गंभीर विचारवंत कसे व्हावे?:-



आपल्या दैनंदिन जीवनात गंभीर विचारवंत होण्यासाठी वेळ, सराव आणि धैर्य घ्यावे लागतात.  प्रत्येक समस्येवर गंभीर विचार करून सोडवाव्या लागतात. कुतूहल, निरीक्षण अशा गोष्टी खूप उपयोगी पडतात. तर  आपल्या गंभीर विचारांच्या कौशल्यांमध्ये काही सुधारणा करण्यासाठी काही पायर्‍या दिलेल्या आहेत. 


Steps of Critical Thinking (गंभीर विचारसरणीच्या पायर्‍या:-)

                                 


 1. Identify the problem or question. (समस्या किंवा प्रश्न ओळखा.)

नेमक्या समस्या किंवा प्रश्न ओळखा . जितके शक्य असेल तितके तंतोतंत होणे .  समस्येचे संकुचन जितके सोपे होईल तितके निराकरण किंवा उत्तरे शोधणे . तसेच प्रश्न नीटपणे समजून घेणे.  व त्यासाठी योग्य  प्रश्न विचारणे .  

 

2. Gather data, opinions, and arguments .(. डेटा, मते आणि वितर्क एकत्र करा.)

 भिन्न स्त्रोत आणि दृष्टिकोन दर्शविणारे अनेक स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करा.


3. Analyze and evaluate the data.(डेटाचे विश्लेषण आणि मूल्यांकन करा.)

 ही माहिती , स्रोत विश्वसनीय आहेत का ?  त्यांचे निष्कर्ष डेटा- अचूक  किंवा फक्त वाद  आहेत?  तसेच  दिलेल्या गृहीतकांना समर्थन देण्यासाठी पुरेशी माहिती किंवा डेटा आहे का?

 

4. Identify assumptions.(.गृहितक ओळखा.)

 कित्येकदा नेहमीच्या पठडीमधला विचार करून चालत नसल्यामुळे  काय केल्यानं काय घडू शकेल याचे अंदाज बांधावे लागतात.[Out of the Box Thinking ]

आपणास खात्री आहे की आपणास आढळलेले स्रोत निष्पक्ष आहेत? आपणास खात्री आहे की आपण उत्तर शोधताना पक्षपात तर केला नाही ना ?

 

5. Establish significance.(. महत्त्व स्थापित करा.)

 माहितीचा कोणता भाग सर्वात महत्वाचा आहे? हा नमुना पुरेसा आहे का ?  तसेच आपण सोडवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या समस्येशी सर्व मते आणि युक्तिवाद देखील संबंधित आहेत का ?

 

6. Make a decision/reach a conclusion.(निर्णय घ्या / निष्कर्षापर्यंत पोहोचा.)

 शक्य असलेले विविध निष्कर्ष ओळखा आणि त्यापैकी कोणते (असल्यास) पुरेसे योग्य  आहेत का?. निष्कर्षावर आंधळेपणानं विसंबून न राहाता त्यामधलं नेमकं काय घ्यायचं आणि काय बाजूला सोडायचं यासाठीची निर्णयक्षमता विकसित केलेली आहे का? हे करत असताना ,सर्व संभाव्य पर्यायांची शक्ती आणि मर्यादा ओळखा. क्रिटिकल थिंकर’कडे  कुठल्याही परिस्थितीमध्ये नेमकं  काय केलं पाहिजे याचं आकलन करून घेण्याची क्षमता असेल तर तो ‘  गो गेटर’ असतो.

 

7. Present or communicate.(उपस्थित किंवा संप्रेषण.)

 एकदा का आपण एखाद्या निष्कर्षांवर पोहोचल्यानंतर सर्व भागधारकांसमोर ते सादर करा.. खुल्या दिलानं सगळ्या शक्यतांचा विचार करावा  आणि इतरांची मतं ऐकावी . नेमके प्रश्न विचारणं, कुणाशीही सहजपणे संभाषण करू शकणं, कमी शब्दांमध्ये काम साधणं हे सगळं जोपासावं लागतं. 



तर थोडक्यात , गंभीर विचारांनी समस्या सोडविता येतात.  नवे मार्ग शोधले जातात . गंभीर विचारसरणीमुळे भाषा आणि सादरीकरण कौशल्य वाढते. स्पष्ट आणि पद्धतशीरपणे विचार केल्याने आपण आपल्या कल्पना व्यक्त करण्याचा मार्ग सुधारू शकतो.  विश्लेषण,  आकलन क्षमता सुधारते. 

म्हणजेच जो कुणावर ही विसंबून न राहाता किंवा परिस्थितीला दोष न देता नेटानं मार्ग काढत पुढे जातो तोच खरा  क्रिटिकल थिंकर. All The Best 👍and Just Do It . 

असेच Life Skills secrets जाणुन घेण्यासाठी ,माझे पुढील Blog नक्की वाचा. व तुमच्या मुलांच्या विकासासाठी माहीती मिळवण्यासाठी NESA Learning Solutions चा , https://www.facebook.com/groups/246525935974332/?ref=share
Facebook Group नक्की  join करा 

https://nesalearning.com

Website link ला भेट द्या. 

Waiting to welcome you.....

आपल्याला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या अनमोल प्रतिक्रिया जरूर द्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. म्हणजे त्या प्रमाणे मला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. 

हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

With Warm Regards ,
Mrs.Nehal Shinde.
Nesa Career Growth Expert.
M.A. in Education.
NLP Practitioner.

चला भेटूयात पुढील भागात .

Comments

खूपच जबरदस्त नेहल ताई
सगळ्यांसाठीच उपयुक्त लिखाण

Popular posts from this blog

7 Tips for Career Success

2.कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये Part 1