2.कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये Part 1

 

2.कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )


  

नमस्कार, 🙏

तुम्हाला ,तेच तेच काम करत रहाण्याचा🥱 कंटाळा आलाय का ?
 तुम्हाला ,स्वतःमध्ये आत्मविश्वास💪 निर्माण करायचा आहे का?
 तुमच्या, डोक्यात रोज  नव नविन भन्नाट ideas 💡येतात का ?
जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏
तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. 
नमस्कार ,मी नेहल शिंदे.
 Certified Career Analyst.
Founder of Nesa Learning Solution LLP.
With 20  years experience in education field. 
 
 मला ,येत्या 5 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे.
जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही  कौशल्य हे जीवनकौशल्य (Life Skills )समजले जाऊ शकते.

शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहेच  पण कौशल्य ही सर्वात महत्त्वाची असतात. 

"प्रत्येकजण सर्जनशील जन्म घेतो” - ह्यू मॅक्लेओड

"Everyone is born creative" - ​​Hugh McLeod






तर चला जाणून घेऊयात आयुष्य बदलणारे कल्पनाशक्ती

( Creative Thinking ) कौशल्ये,

तर हे Creative Thinking म्हणजे काय?

Creative Thinking विचारसरणी ही आपल्या कल्पनेचे पालनपोषण करण्याची प्रक्रिया आहे .
जी आपल्याला  out of the box मधून विचार करण्याची परवानगी देते.
आपल्या मनास सर्जनशीलपणे विचार करण्यास प्रशिक्षित करते .
आपणास नवनवीन मार्गांनी शोध लावण्यास, समस्येचे निराकरण करण्यात
व संवाद साधण्यास मदत करते.



 क्रिएटिव्ह विचारवंतांना
नोकरीच्या बाजारपेठेत खूप मोठी मागणी आहे.

भविष्यातील नोकरीमध्ये सर्जनशील विचार करणे आवश्यक होणार आहे.
मुक्त मनाने विचार केल्याने आपल्याला नवीन कल्पना आणि
विचारांचा शोध सुरू करण्यासाठी दररोज सकाळी उठण्याचे कारण 
मिळते .

तर, चला आपले
Critical Thinking
कौशल्य विकसित करूया!




आपल्या दैनंदिन जीवनात
Critical Thinking चे  महत्त्व 

👉 प्रत्येक व्यक्ती त्यांचे
Creative कौशल्य सुधारू शकते.

👉 असे विचार केल्याने आपण आपल्या रोजच्या जीवनातील ,गोष्टी शोधण्यासाठी ब्रेनपॉवरचा वापर करून  समस्या solve करण्यास मदतच होते.
👉 हे आपल्याला शाळा, विद्यापीठ
,संस्था किंवा घरी  संवाद साधण्यास
 मदत  करते .हे आपले जीवन  जगण्यासाठी  ऊर्जा देते.

👉 Creative thinking ने जेव्हा आपण  मोकळेपणाने विचार करतो तेव्हा 
      आपण आनंदी व्यक्ती बनतो.

👉 असे विचार केल्याने केवळ आपण आपल्या जीवनातच नव्हे तर
       इतरांच्या जीवनात देखील आनंद पसरवत असतो .

👉  अश्या विचारांमधून सुंदर कार्य घडते आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
तसेच आपल्या भावना व्यक्त करण्यात मदत होते .

👉 Out of the Box Thinking नवनवीन संधी शोधण्यात मदत करते.
तुम्हांला तुमच्या जीवनातील प्रत्येक  टप्प्यावर समाधान देते.




कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )  आवश्यक असण्याची काही कारणे आहेत –
 
वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनावरून असे आढळले आहे की, बुध्दिमत्ता हे व्यक्तीचे जीवनमान वाढविण्याचे कारण नसून creative  thinking हे  प्रमुख कारण आहे. कदाचित त्यामुळेच  मेंदूमधील मज्जासंस्थेचे नेटवर्क उत्तेजित होत असते .

☆  Creative Thinking मुळे तणाव, नकारात्मक भावना कमी होते आणि आरोग्य सुधारण्यात मदत होते.
☆  कल्पनाशक्ती मुळे जीवन कौशल्य विकसित  होण्यास मदत होते.
☆ कल्पनाशक्तीमुळे  समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. 
हे व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात खूप च उपयुक्त आहे. हे विचारांमधून अनिश्चिततेशी यशस्वीपणे लढा देण्याची ताकद येते.
     
               


कल्पनाशक्ती( Creative Thinking )करणे हे प्रत्येकासाठी आवश्यक कौशल्य आहे.
त्यासाठी जवळपास च्या नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहेत.

१• स्वतःच्या भावनांना दाबू ठेवू नका. स्वतःला विरोध करू नका. तुमच्या मनातील गोष्टी तुमच्या मित्रांबरोबर मोठ्याने सांगा.
२• मोकळ्या मनाने दिवसांचे स्वप्न बघितल्या मूळे आपल्या कामासंबंधित गोष्टींबद्दल आश्चर्यचकित असे  positive results मिळतात.  व आपल्याला  नव-नवीन मार्ग सापडतात. 
३• नेहमी काही तरी नवीन करीत रहा किंवा जुन्या गोष्टींना नवीन प्रकारे करा.
४• जे अन्न तुम्ही खाता, जो सुवास तुम्ही घेता, त्या गोष्टींबद्दल आनंद घ्या.
५• धोके पत्करा. दिवसभराच्या घटना किंवा अनुभव लिहून काढा.
६• चौकसपणाने  संपूर्ण जगाचा प्रवास करा. नवीन ठिकाणांना भेट द्या. नवीन ठिकाणी जाण्यामुळे मन आणि भावना जागृत होतात.
७•  लायब्ररीत जाऊन  वाचन करून, आपण आपली कल्पनाशक्ती वाढवू  शकतो.




८•नियमितपणे का?, कशाला? 
असे  प्रश्न विचारल्यामुळे, शक्यतांचे आकलन होते.
मनातील कल्पना केल्यामुळेच स्मार्ट, अद्वितीय, अनपेक्षित उत्तर शोधले जाऊ शकते.
९•अपयशाच्या भीतीमुळे प्रयत्न करणे सोडू नका. अपयश आणि यश हे दोन्ही कल्पनाशक्तीला  सांधणारा दुवा असल्यामुळे आत्मविश्वास विकसित होतो. ह्या अपयशातच यशाचा मार्ग आहे हे लक्षात ठेवा.
१०.कधी कधी खेळण्याचा आणि विनोद करण्याचा प्रयत्न केल्याने व  आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींमध्ये फेरफार         केल्यामुळे आपण आपली कल्पनाशक्ती वाढवू  शकतो.
११.साहसी आणि जीवनाच्या आव्हानांसाठी सज्ज राहिल्यामुळे देखील आपण आपली कल्पनाशक्ती वाढवू  शकतो.
Just Do It 👍.

विचारांची हॅट्स: डी बोनोद्वारे क्रिएटिव्ह थिंकिंग बद्दल आपण पुढच्या भागात बघणार आहोत.  


तर असे हे Creative thinking  हे एक विज्ञान आहे जे सकारात्मक ऊर्जा व निर्मितीक्षमता वाढविण्यास मदतच करते. तर अशी ही
कल्पनाशक्ती,व्यावसायिक जगात अत्यावश्यकच आहे. व्यवसायाच्या जगात हे नावीन्यपूर्णतेकडे घेऊन जाते.  त्यामुळे उत्पादकतेमध्ये वाढ होते आणि म्हणूनच यशही मिळते.समस्या सोडविण्याची क्षमता वाढवते आणि उद्योगात देखील वाढ होते. 

अभ्यासक्रमासह कल्पनाशक्ती आणि जिज्ञासा , विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण होण्यास मदत करते आणि नवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहित करते. तसेच  भावनिक आणि सामाजिक कौशल्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.  विद्यार्थ्यांच्या समस्येचे निराकरण शोधणयास मदत करते .  
 क्रिएटिव्ह विचारसरणीचे बरेच फायदे आहेत परंतु सर्वात महत्त्वाचा फायदा
म्हण्जे ते आपल्याला एक आनंदी आणि चांगले व्यक्ती बनवते .

 



असेच Life Skills secrets जाणुन घेण्यासाठी ,माझे पुढील Blog नक्की वाचा. व तुमच्या मुलांच्या विकासासाठी माहीती मिळवण्यासाठी NESA Learning Solutions चा ,
Facebook Group नक्की  join करा.

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/CqeujUaZQtfAeAvNmNwVUi

https://nesalearning.com

Website ला जरूर भेट द्या.

Waiting to welcome you.....

आपल्याला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या अनमोल प्रतिक्रिया जरूर द्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. म्हणजे त्या प्रमाणे मला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. 

हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

With Warm Regards ,
Mrs.Nehal Shinde.
Certified Career Analyst 
M.A. in Education.
NLP Practitioner.

चला भेटूयात पुढील भागात .



Comments

जबरदस्त ब्लॉग
छान मार्गदर्शन
जबरदस्त ब्लॉग
छान मार्गदर्शन

Popular posts from this blog

१. गंभीर विचार (Critical Thinking)आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये

7 Tips for Career Success