यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र. Part 2 (The Key🔑To Success ).

Website

 

यशस्वी होण्यासाठी लागणारे १२ मूलमंत्र.  Part 2

 (The Key🔑To Success ). 

नमस्कार, 🙏
मागच्या भागात आपण यशस्वी होण्यासाठी लागणारे ७  मूलमंत्र बघितलेत . 
चला, तर जाणून घेऊयात आता बाकीचे मूलमंत्र 
 तुम्हाला आयुष्यात नक्की काय करायचे आहे ते कळत नाही आहे का ?
आपल्याला अपयश आले तर ,अशी भीती वाटते का?
जर, या प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर माझा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .🙏
तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. 
नमस्कार ,मी नेहल शिंदे.
Nesa Certified Career Analyst.
Founder of Nesa Learning Solution LLP.
With 20  years experience in education field. 
 मला ,येत्या 3 वर्षात 50 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्यांना त्यांच्या करिअरला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे.

यशस्वी होण्यासाठी लागणारा पुढचा   मूलमंत्र    

८.आव्हाने स्वीकारा

 

आव्हाने स्वीकारा. चिंता, भीती ,राग यावर मात करा. यश हवे असेल तर कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. आव्हाने स्वीकारा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा.   अडथळे असतील तर ते पार करून पुढे चालत राहा .संधी शोधा गरज पडल्यास मार्गदर्शन व मार्गदर्शकाची मदत घ्या .नवनवीन कल्पना शोधा . लीडरशिप करा .आपल्या जवळच्या लोकांना मदतीचा हात द्या.  घाईघाईने निर्णय न घेता प्रश्न समजून त्यावर कृती करा.  योग्य सोलुशन व पर्यायांची निवड करा.  स्वतःचे एक मत बनवून त्यावर मार्गक्रमण करत रहा . JUST DO IT. 👍👍


          ९. बदल हे आवश्यक आहेतच.

बदल असेल तर तो स्वीकारून पुढे जाता येते.तेच तेच करत राहाल तर प्रगतीकडे वाटचाल होणार नाही. रोज तेच केले तर एक प्रकारचा तणाव निर्माण होईल. पाण्याचा प्रवाहाला थांबवले तर एक डबकेच तयार होईल .वाहते पाणी शुद्ध असते त्याच प्रमाणे प्रवाहात रहा. नवीन नवीन कल्पना तयार करा व त्या उपयोगात आणून प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करून बघा.त्यामुळे आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होवून आपण ध्येयाच्या जवळ जाल.भविष्याचा अंदाज घ्या. जे होईल त्या साठी स्वतःला तयार करा. बदल हा कठीण असतो ,पण तो गरजेचा आहे. त्यामुळे मानसिकता वाढून आत्मविश्वास निर्माण होतो. नवीन उमेद तयार होते. निसर्गाच्या सानिध्यात रहा. मेडिटेशन करा.ध्यान केल्यामुळे एक प्रकारची मानसिक शांतता व समाधान मिळते.  जो  स्वतःमध्ये बदल घडवतो तोच यशस्वी होतो.  

                                  १०.वारसा जपा संस्कृतीचे जतन करा.



 पैसा जरी जीवनात जीवन जगण्यासाठी हवा असला तरी आपली नीतिमूल्ये विसरू नका. 

एकमेकांना मदत करा .गेट-टुगेदर करा. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात वेळ घालवा.
ऐतिहासिक स्थळांना भेट द्या .आपले सणवार साजरे करा पण समाजाचे भान ठेवा .कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या सर्वधर्म समभाव बाळगा आदर ठेवा आपल्या मागच्या पिढीला काही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या त्यांना आत्मनिर्भर बनवा महिलांना समान वागणूक द्या झाडे लावा .आपल्याला काय हवे ते कळले तर त्यावर सक्षम सर्व लक्ष केंद्रित करा . 

11.अंतिम ध्येय गाठा




ध्येयावर सर्व ऊर्जा केंद्रित करा . कोणाचे मन दुखवू नका .
सकारात्मक लोकांबरोबर राहा . आपली आवड जपा. उत्साहाने काम केल्यामुळेआपली 
Productivity वाढते . Excitement निर्माण होते पॉझिटिव्ह एनर्जी येऊन आपली कामे सोपी होतात. निगेटिव्ह विचार करणाऱ्या पासून दूर राहा. आपले लक्ष्य ध्येयावर ठेवून एकेक टप्पा गाठा . टेक अ स्मॉल स्मॉल स्टेप.  यामुळे निराश शक्तीला प्रेरणादायी ठरते व त्याला आत्म भरारी घेण्यासाठी मदत करते.

         १२.स्वतःला कमी लेखू नका 

 जीवनात , आपण किती खूष आहेत त्यापेक्षा आपल्यामुळे कितीजण खूषआहेत यावर यशअवलंबून असते .



लक्षात किती राहते, यापेक्षा तुम्ही किती मोठा विचार करता ते महत्त्वाचं आहे.
कामात सातत्य ठेवा . 

आमचे गुरू केतन सर online स्वराज्याचे  संस्थापक नेहमी एक वाक्य सांगतात, 
"पाणी आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाण्याचा विजय होतो ते म्हणजे ताकतीने नाही तर सातत्याने."

स्वतःला दुसऱ्याबरोबर कम्पेअर करू नका .
छोट्या छोट्या गोष्टींचे सेलिब्रेशन करायला शिका .
बोलताना योग्य शब्दांचा वापर करा.
कोणाशी ही दोस्ती करताना अशा लोकांशी करा की नॉलेज शेअरिंग करून तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी समजतील. खोटे बोलू नका खरे बोला.
प्रथम स्वतःमध्ये सुधारणा करा मग दुसऱ्यांना सुधारा. तुमचे भले व्हावे अशा लोकांबरोबरच दोस्ती करा.
स्वतःची पण काळजी घ्या . खांदे मागे ठेवून ताठ उभे रहा.


यश मिळवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आक्रमकता असणे आवश्यक असते, असे विराट कोहली म्हणतो. 



त्याने यशस्वी होण्यासाठी असेच काही कानमंत्र दिले आहेत. त्यावर एक नजर...
🏹 तुम्ही किती टॅलेंटेड आहात याने काहीच फरक पडत नाही, तुम्ही किती कठोर मेहनत घेता त्यावर यश अवलंबून आहे.
🏹 सभोवती राहणाऱ्या लोकांचा तुमच्या स्वभाव आणि क्षमतेवर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे नेहमी चांगल्या आणि एनर्जेटिक लोकांसोबत राहा.
🏹 मी कधीच कोणावर टीका करत नाही. त्यापेक्षा स्वतःच्या चुका शोधण्यात व सुधारण्यात आपली ऊर्जा खर्च करतो.
🏹 परफॉर्मन्स चांगला असो कि वाईट, स्वतःला सर्वात चांगले करण्यासाठी नेहमीच चीअर करत रहा.
🏹 आपली स्ट्रेंथ आणि विकनेस समजून घ्या. आरशात स्वतःला पाहण्यास शिकाल तेव्हाच यशस्वी व्हाल.


तुम्हाला जर तुमचे ध्येयाकडे 
वाटचाल करायची असेल तर, समविचरी लोकांची ही  कम्युनिटी जॉईन करा आणि 2021 मध्ये प्रचंड सकारात्मकता अनुभवा.


Nesa Career Growth Pathways. हा माझा Facebook Group आहे.त्याची Link मी Share करत आहे .तुम्हाला करीयर संदर्भात काही जाणून घ्यायचे असेल तर हा Group नक्की join करा.
Facebook

https://nesalearning.com

Website ला जरूर भेट द्या.

Founder of Nes
a Learning Solution LLP.

With 20 years experience in Education field.

जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही कौशल्य हे जीवनकौशल्य (Life Skills )समजले जाऊ शकते.
शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहेच पण कौशल्य ही सर्वात महत्त्वाची असतात. 
.
Waiting to welcome you.....
Free Guidence साठी तुम्ही माझ्या   Whatsapp Group ला Join करू शकता.  
https://chat.whatsapp.com/CqeujUaZQtfAeAvNmNwVUi

तुमची अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा.

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद!
असेच Life Skills Secrets जाणुन घेण्यासाठी 
माझे पुढील blog नक्की वाचा.
 

With warm regards 
Mrs.Nehal Shinde
Nesa ,Career Growth Expert.
M.A. in Education. 
NLP Practitioner.


Comments

Very informative Sneha Tai
Very informative Sneha Tai

Popular posts from this blog

१. गंभीर विचार (Critical Thinking)आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये

7 Tips for Career Success

2.कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये Part 1