आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये,खास विद्यार्थ्यांसाठी भाग 2.

आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये,
खास विद्यार्थ्यांसाठी. भाग2


            


नमस्कार ,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये  विद्यार्थी व पालक गोंधळून गेलेले आहेत.

त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता विकसित होण्यास बरेच अडसर निर्माण होत आहेत. 

तर अश्या ह्या,खऱ्या जगासाठी शालेय विद्यार्थी तयार आहेत  का ?

हे शालेय शिक्षण या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्याला  मदत करते आहे का ?

त्यांचा संपूर्ण वेळ अभ्यासातच  वाया जातो आहे का?

 तो नोकरीच्या ठिकाणी प्रवेश करायला  तयार आहे का?

असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर हा ब्लॉग तुमच्या साठीच आहे आणि तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.
Hi 
I am Mrs.Nehal Shinde.
Nesa Certified Career Analyst. 
Founder of Nesa Learning Solution LLP.
With 20 years experience in education field. 
येत्या 3 वर्षात 10000 विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना त्यांच्या करीयर ला दिशा व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करायची आहे.

तर चला जाणून घेऊयात ,आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये,खास विद्यार्थ्यांसाठी

जीवनात उपयोगी पडणारे कोणतेही  कौशल्य हे जीवनकौशल्य (Life Skills )समजले जाऊ शकते.शिक्षण हे अधिक महत्त्वाचे आहेच  पण कौशल्य ही सर्वात महत्त्वाची असतात. 

तर विद्यार्थ्यांमध्ये अश्या जीवन कौशल्य विकासाची गरज का आहे?



आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना प्रभावीपणे जीवन जगण्यासाठी

 तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन आव्हाने व कामाची अंमलबजावणी करण्यासाठी.तसेच त्यांना भविष्याची तयारी करण्यासाठी व त्यांचा  अभ्यास अधिक प्रभावीपणे व कार्यक्षमतेने होण्यासाठी ,अश्या कौशल्य विकासाची आवश्यकता आहे . 



      


यशस्वी जीवन जगण्यासाठी विचारपूर्वक शिक्षणाची, प्रशिक्षणाची व कौशल्य विकसनाची अत्यंत गरज आहे. तसेच ह्या जीवन कौशल्यांमुळे जीवन जास्तीत जास्त कार्यक्षमपणे व यशस्वीपणे जगता येवू शकेल.या आव्हानात्मक कामाच्या ठिकाणी , स्वतःला विकसित करण्यासाठी त्याला कशाची आवश्यकता आहे हे जाणून घेऊया!.


गंभीर विचार (Critical Thinking)

कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )

संवाद कौशल्य (Communications Skill )

सहकार्य (Collaboration)

नेतृत्व कौशल्य ( Leadership skills)

निर्णय क्षमता (Decision-making)

भावनिक बुद्धिमत्ता( Emotional Intelligence )

वैयक्तिक कौशल्ये (Personal skills)

संयम (self-control)

समस्या सोडवणे( Problem-solving)

वाचन आणि लेखन कौशल्य (Reading and Writing Skills)

उद्योजक कौशल्ये (Entrepreneurial skills)

संख्यात्मक कौशल्य (Numerical skills)

परस्पर वैयक्तिक आणि आंतरवैयक्तिक कौशल्ये (Interpersonal and Intrapersonal skills)

नेटवर्किंग (Networking).



शिक्षणात जीवन कौशल्याचा उपयोग कसा करता येईल ?

  •  विद्यार्थ्यांना जीवनाचा पुरेपूर फायदा घेता येईल. 

  •  विद्यार्थ्यांना वर्गात व बाहेरच्या जगात भरभराटीस उपयोग होईल. 

  •  सकारात्मक परिणाम साध्य होतील. 

  •  यश मिळविण्यासाठी, अभ्यासात प्रगती होईल. 

  •   जबाबदारीची भावना येईल. 

  •  सहकार्य करण्याची आवड निर्माण होईल. 

  •  संवाद साधले जातील .

  •  चांगले नागरिक तयार होतात . मानसिक व शारीरिक विकास होईल.

  •  शालेय जीवन चांगल्याप्रकारे जगता येईल. 

  •  वेळेचे व्यवस्थापन करता येईल. 

  •  पाठ्यपुस्तकां व्यतिरिक्त अधिक काही शिकता येईल.

  •  लहान वयातच निवडीचे स्वातंत्र्य मिळेल.

  •  काय करावे ?आणि काय करू नये ?हे ज्ञान अवगत होईल .

  •  नेतृत्वगुण ,जिज्ञासा, संवाद, कल्पना यांना चालना मिळेल .

  • अशाप्रकारे मुलांच्या शैक्षणिक तसेच व्यवसायिक भविष्याचा पाया उभारला जाईल. म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमध्ये यांचा विकास करणे महत्त्वाचे आहे.


 तर ह्या जीवनकौशल्याचे फायदे काय आहेत?

सतत बदलणारे वातावरण, दैनंदिन जीवनातल्या अडचणी व तंत्रज्ञानातील बदल. जागतिक घडामोडीमुळे शिक्षणात वाढलेले महत्त्व तसेच कामाच्या ठिकाणी जीवन कौशल्याचे महत्व आहे.

तर ह्या जीवनकौशल्यामूळे आनंदी जीवन जगता येते.


.

  • कामाची जबाबदारी घेण्याची हिंमत वाढते.

  • आत्मविश्वास  वाढतो.  

  • सहकार्याची भावना वाढीस लागते.

  • निर्णय क्षमता वाढते.  मानसिकता, कृतज्ञता भावना वाढीस लागतात.

  •  समस्या हाताळता येतात.

  •  स्व व्यवस्थापन तसेच  नोकरी व कामाच्या ठिकाणी लवचिकता व तत्परता येते.

  •  स्वाभिमान विकसित होतो.

  • सकारात्मकता येते.  आव्हाने व कठीण काळात तसेच जीवनातील नवनवीन संधीचा उपयोग घेता येतो.

  •  समाजाला लाभ होतो.  सांस्कृतिक (Cultural Development ) , नागरिकत्व,अंतरराष्ट्रीय(International ) देवाणघेवाण करताना फायदा होतो .



आपल्या शिक्षण केंद्रित पद्धतीमध्ये बदल करून अभ्यासक्रमात असे बदलणारे शिक्षण देणे आवश्यक आहे.

भारतासारख्या देशाला या गोष्टीकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे कारण आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक बनणार आहे. मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या जीवन कौशल्यांची भरपूर गरज आहे.

  या लेखात आपण , विद्यार्थ्यांसाठी आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये, कोणती आहेत यावर चर्चा केलेली आहे .
पुढील भागात आपण प्रत्येक कौशल्या बद्दल माहिती घेणार आहोत .
 कल्पना करा, अशा प्रकारे त्यांच्या 
शैक्षणिक तसेच व्यावसायिक आघाडीवर त्यांना भविष्याचा पाया उभारण्यास व आव्हानांचा सामना करण्यासाठी या  कौशल्यांची मदतच होणार आहे.

असेच Life Skills Secreats जाणून घेण्यासाठी ,माझे पुढील Blog नक्की वाचा. व तुमच्या मुलांच्या विकासासाठी माहीती मिळवण्यासाठी NESA Learning Solutions चा , https://www.facebook.com/groups/246525935974332/?ref=share
Facebook Group नक्की  join करा.

https://nesalearning.com.

Website ला जरूर भेट द्या.

Waiting to welcome you.....

आपल्याला जर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या अनमोल प्रतिक्रिया जरूर द्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. म्हणजे त्या प्रमाणे मला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. 

हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचल्या बद्दल आपले खूप धन्यवाद 🙏. 

With Warm Regards ,
Mrs.Nehal Shinde.
Nesa Learning Career Growth Advisor.
M.A. in Education.
NLP Practitioner.

चला भेटूयात पुढील भागात .




Comments

खूप छान ब्लॉग नेहल मॅडम
Very nice dear...really so nice

खूपच छान ब्लॉग नेहल ताई
खूप छान टिप्स दिल्यास
Nehal Shinde said…
धन्यवाद Uc

Popular posts from this blog

१. गंभीर विचार (Critical Thinking)आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये

7 Tips for Career Success

2.कल्पनाशक्ती:-( Creative Thinking )आयुष्य बदलणारी १५ कौशल्ये Part 1